जनतेज न्युज

सांगली शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाचा कायापालट होणार आहे.

मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नियोजनामुळे सांगलीचे डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण कात टाकणार ,,,
युद्ध पातळीवर काम सुरू असून क्रीडांगणाच्या सपाटीकरण आणि स्वच्छता कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे सांगलीकर जनतेला एक सुसज्ज आणि लोकपोयोगी क्रीडांगण उपलब्ध होणार आहे.
प्रतिनिधी , सांगली : सांगली शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाच्या सुशोभीकरण आणि विकासाबाबतचे नियोजन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. यामध्ये या क्रीडांगणामध्ये विविध खेळांचे ग्राउंड, नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक तसेच खोखो कबड्डी हॉलीबॉल तसेच कमी जागेतील खेळ यासाठी हे क्रीडांगण सुसज्ज केले जाणार आहे. या क्रीडांगणाच्या चोहोबाजुंनी आकर्षक विद्युत व्यवस्था केली जाणार असून संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या देखरेखेखाली असणार आहे. याचबरोबर क्रीडांगणाच्या आवारात असणाऱ्या पॅव्हेलीनमध्ये महापालिका क्रीडाधिकारी यांचे कार्यालय सुरू केले जाणार असून या क्रीडांगणाचे महत्व अबाधित ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. सध्या क्रीडाधिकारी महेश पाटील यांच्या माध्यमातून डॉ आंबेडकर क्रीडांगणाच्या स्वच्छता आणि सपाटीकरण कामास सुरवात झाली असून संपूर्ण क्रीडांगणाचे सपाटीकरण करून चोहोबाजुनी वॉकिंग ट्रॅक केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नियोजनानुसार सांगलीकर जनतेला डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण एक सुसज्ज आणि कायापालट झालेले पाहायला मिळणार आहे.