जनतेज न्युज

नवी मुंबईतील सिडको निर्मित आणि खाजगी धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी .

प्रतिनिधी , मुंबई : वी मुंबईतील सिडको निर्मित आणि खाजगी धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे.. या धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी सिडकोने 4 एफएसआयचा प्रस्ताव तयार केला असून येत्या 2 दिवसात हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर होणार असल्याचे भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितलंय.. मागील महिन्यात मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन 4 एफएसआय ची मागणी केली होती.. या बैठकीनुसार सिडको आणि महापालिकेने शहरात कशाप्रकारे 4 एफएसआय देता येऊ शकतो याचं नियोजन केलंय.. या प्रस्तावानुसार येत्या नवीन वर्षात नवी मुंबईकरांना 4 एफएसआयची भेट मिळणार असल्याचे आमदार म्हात्रे यांनी सांगितले..