जनतेज न्युज

सदर बाजार पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार अल्पवयीन मुलीचे रोखले लग्न

प्रतिनिधी , जालना : समाजामध्ये अजूनही मुलगी ही ओझं आहे ,असे जालना नगरीतील घडलेल्या या घटनेवरून समजते.जालना शहरातील लोधी मोहल्ला येथे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये एकूण सतरा मुलं व 17 मुलींचे लग्न होणार होते परंतु त्यामध्ये एका मुलीचे वय 14 वर्ष असले बाबत माहिती पोलिस निरीक्षक श्री संजय देशमुख, यांना मिळाल्याने त्यांनी खात्री करण्यासाठी पोलिस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार यांना सांगितले असता श्री पवार यांनी सदर ठिकाणी जाऊन सामूहिक विवाह सोहळा आयोजकांना भेटून त्यांना कात्राबाद चौकी येथे बोलावून त्यांच्या मुला मुलींचे वयाचे प्रमाणपत्र हस्तगत करुन खात्री करीत असताना त्यांना कळाले की त्यापैकी आणखी तीन असे एकूण चार मुलींचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्याने त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी कमी वय असलेल्या पालकांना वेगळे बोलावून त्यांना कायद्याची जाण देऊन मुलींचे लग्न अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच करावे असे समज पत्र पोलिस निरीक्षक श्री संजय देशमुख यांच्या समक्ष हजर करून त्यांना दिलं , व त्यांचे समुपदेशन केले व त्यांनी तशी खात्री दिली की आमच्या मुलींचे लग्न अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच आम्ही करणार असल्याची खात्री दिली व दिनांक 8/ 12/ 2020 रोजी सायंकाळी साडे नऊ वाजता एकूण 17 जोडप्यांचे ऐवजी वय पूर्ण झालेल्या 13 जोडप्यांचे लग्न झाले व चार जोडप्यांचे लग्न अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच करण्याचे समज पत्र दिल्याने चार कोवळ्या वयातील मुलींचे लग्न रोखण्यास सदरबाजार पोलिसांना यश आले सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री विनायक देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक श्री विक्रांत देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संजय देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मंजुषा सानप पोलीस उप निरीक्षक श्री राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पल्लवी जाधव पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार पोलीस नाईक सक्रूदिन तडवी पोलीस कॉन्स्टेबल, इर्शाद पटेल, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका बोरकर यांनी केली