प्रतिनिधी , राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढवण्याचा निर्णय बुधवारी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने ५ जागा जिंकल्या होत्या. तीन पक्ष एकत्र आल्यास भाजपच्या विजयरथाला रोखणे शक्य असल्याचे दिसून आल्यामुळे पुन्हा एकीचे बळ कसे असते ही सिद्ध करून दिले आहे. महाविकास आघाडीच्या झेंड्या खाली निवडणूक लढवण्याचा निर्णय हा स्वागतार्ह आहे, तसेच पक्ष श्रेष्ठी जो आदेश देतील त्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडू अशी प्रतिक्रिया माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली.
