प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद मध्ये शिवसेनेचा शिवसैनिक मेळावा सुरू आहे. याठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार आंबदास दानवे यांनी बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांच्या मतदार संघात त्यांच्या विरुद्ध जोरदार टीका केली आहे. शिरसाठ यांना त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून जोरदार हल्ला केला शिरसाठ यांचा सूर्याजी पिसाळ म्हणून उल्लेख केला. तसेच शिरसाठ म्हणतोय मुख्यमंत्र्यांना भडव्यांनी घेरले तर शिरसाठ हे मतदार संघात कोणालाच भेटत नाही त्यांना कशाने घेरले असा प्रश्न उपस्थित केला तेव्हा शिवसैनिकांनी डान्स बारने घेरले असल्याचे सांगितले.
