जनतेज न्युज

आडनावा वरून ओबीसींची जनगणना करणे चुकीचे आहे – माजी खासदार हरिभाऊ राठोड

प्रतिनिधी, यवतमाळ : महानगरपालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. प्रभाग रचना, मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाविना ही निवडणूक होते की काय अशी भीती काहींना सतावत आहे. राज्य सरकार इंपिरिकल डाटा गोळा करून बांटिया आयोगाला सादर करणार आहे. मात्र, हा डाटा आडनावावरून गोळा करीत असल्याचे दिसत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. यापासून बांटिया आयोग अनभिज्ञ आहे. असे झाल्यास ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, आणि ओबीसी समाज राज्य सरकार ला माफ करणार नाही, असे खडेबोल माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सुनावले आहे.