जनतेज न्युज

म्हैसाळ येथील ९ जणांची आत्महत्या नसुन हत्याकांड

प्रतिनिधी, सांगली : म्हैसाळ येथील ९ जणांची आत्महत्या नसून हत्याकांड, पोलीस तपासात बाब समोर आली आहे. सोलापुरातील दोघांना अटक झाली असून दोघांनी विषारी औषध देऊन खून केल्याचे समोर येत आहे. मयत मधील दोघांची अनोळखी व्यक्ती सोबत गुप्त धनाबाबत भेटी होत असल्याचे आणि समोरच्या व्यक्तीस पैसे दिले असल्याचेही पोलीस तपासात समोर आले.