जनतेज न्युज

बनावट लग्न करून मुलांना फसवणाऱ्या महिलांच्या टोळीला चंदनझिरा पोलीसांकडुन अटक

प्रतिनिधी , जालना : नवरदेवाकडील मंडळींकडून पैसे उकळून खोटे लग्न करणाऱ्या महिलांच्या एका टोळीला जालन्यातील चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ३ मुलींसह एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून नवरदेवा कडील मंडळींकडून उकळलेले पैसे, मोबाईल आणि एक क्रूझर गाडी जप्त करण्यात आली आहे.

गुजरात राज्यातील एका पियुष नावाच्या व्यक्तीने जालन्यातील चंदनझिरा पोलिसांकडे लग्न करून मुलीने फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी लग्न करून फसवणाऱ्या ३ मुलींसह, एक महिला आणि एक पुरुष अशा ५ जणांना जेलबंद केलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यात आणखी काही आरोपी अडकण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.