प्रतिनिधी , भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना धुळे येथील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या जवळच घडली. याप्रकरणी बस चालक पसार झाला आहे. घटनास्थळी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
संतोष चौरसिया वय 31 वर्ष राहणार हमाल मापाडी धुळे असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. संतोष चौरसिया हे आपल्या आई सोबत नातेवाईकांच्या इथे असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या बसने दुचाकीस्वाराचा जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार असलेल्या संतोष चौरसिया यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सदर प्रकरणाची माहिती मिळताच उपमहापौर कल्याणी ताई अंपळकर यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यांनी सांगितले की, चाळीसगाव चौफुली जवळ असलेल्या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहे. या परिसरातील नागरिकांनी पीडब्ल्यूडी विभागाकडे सदर रस्त्यावर गतिरोधक ची व्यवस्था करण्यासाठी वारंवार निवेदन देऊन देखील पीडब्ल्यूडी विभाग या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच सदर चाळीसगाव चौफुली रस्त्यावर अनेक अपघात होऊन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पीडब्ल्यूडी विभागाने तात्काळ सदर घटनेची दखल घेत लवकरात लवकर चाळीसगाव चौफुली रोडवर गतिरोधक ची व्यवस्था करावी अशी मागणी उपमहापौर कल्याण यांनी यावेळी केले.
