जनतेज न्युज

बाल विवाह रोखण्यात प्रतीबंध समितीला मोठ यश , गृहमंत्र्यांकडून दखल

प्रतिनिधी , उस्मानाबाद : बाल विवाह मुळे पुढे कुपोषीत बालक व माता मृत्यु यासारख्या अडचणी येतात त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात विवीध अधिकारी व एनजीओ चा समावेश असलेली बाल विवाह प्रतीबंध समीती स्थापन केली असुन ही समीती प्रभाविपणे काम करत आहे. विषेशतः या समीतीच्या कार्याची दखल घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातुन अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यात होणाऱ्या बाल विवाहची माहिती मिळताच या समितीचे सदस्य संबंधीत गावच्या विवीध अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पालकांचे समोपदेशन करतात. या समितीने गेल्या वर्षी २२ बालविवाह तर या वर्षी आता पर्यंत २८ बालविवाह रोखले आहेत.