प्रतिनिधी , बीड : ज्येष्ठ नागरिक तसेच दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींना 1 मार्च म्हणजे सोमवारपासून कोरोना विरोधी लस देण्यात येणार होती . मात्र सोमवारी अचानक कोविंड पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे प्रत्यक्षात लसीकरण सुरू होऊ शकले नाही . याबाबत येथील निवासी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुखदेव राठोड यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की , ऑनलाईन नोंदणी साठी येणाऱ्या अडचणी दूर झाल्यानंतर तात्काळ ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींना लसीकरण करण्यात येणार आहे .
बीड जिल्हा आरोग्य विभागाने प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांना सोमवारपासून लसीकरण करण्याची तयारी पूर्ण केली होती . मात्र सकाळपासूनच कोविड ऑनलाइन लसीकरण नोंदणीचे पोर्टल तांत्रिक अडचणीमुळे बंद पडले . परिणामी ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य झाले नसल्याने सोमवारी बीड जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य व ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण झाले नसल्याचे चित्र पाहायला मिळाले .
बीड जिल्ह्यात एकूण वीस खाजगी रुग्णालयांना कोविड लसीकरणासाठी मान्यता दिलेली आहे मात्र त्या रुग्णालयाची सगळी तयारी झालेली आहे का ? याबाबत अगोदर जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने पाहणी करण्यात येणार आहे व त्यानंतरच प्रत्यक्षात खाजगी रुग्णालयात मार्फत सर्वसामान्य नागरिकांना लस देता येणार असल्याचेही आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले .
दुपारी साडेबारा नंतर तांत्रिक झालेला प्रॉब्लेम हा दुरुस्त झाला होता त्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यांमध्ये 269 जणांनी कोरोनाची लस घेतली आहेत
विशेष म्हणजे अंबाजोगाई गेवराई आणि आष्टी तालुक्यामध्ये एकाही व्यक्तीने कोरणा ची लस घेतली नाहीये या तालुक्याचे आकडेवारी शून्य होती
1 मार्च रोजी घेतलेली कोरोनाची लस तालुकानिहाय आकडेवारी
• बीड तालुका 47• केज तालुका 73• शिरूर 6• वडवानी 6• धारूर 1• माजलगाव 61
• गेवराई 0• परळी 69• आष्टी 0• पाटोदा 6
मात्र आज बीड जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी कोरोणाची लस घेण्यासाठी पाठ फिरवली होती. यामध्ये एकूण 89 ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे
