प्रतिनिधी, बुलढाणा : ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात राज्यसरकारने एम्पिरिकल डेटा गोळा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली आहे, आणि त्या अनुषंगाने 12 जुलै रोजी ओबीसी च्या बाजूने निकाल लागणार असल्याचा विश्वास ओबीसींचे नेते तथा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार त्यांनी दिला असून, होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार नाहीत अशी घोषणाही त्यांनी यावेळी ओबीसी समाजाला मार्गदर्शन करताना केली आहे…
कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसी संघर्ष मेळाव्यासाठी बुलडाण्यात आले असताना बोलत होते. बुलढाणा जिल्हा भविष्यात ओबीसीसाठी एक बलस्थान निर्माण होईल -मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा.12 जुलै रोजी ओबीसीच्या बाजूने निकाल लागण्याचा विश्वास.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील गर्दे हॉलमध्ये ओबीसी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी समाजाच्या मुला-मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृहे देणार असून ओबीसी समाजासाठी सावित्रीबाई फुले घरकुल योजना देखील लवकरच आणली जाणार असल्याचे यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. दरम्यान वडेट्टीवार यांचे भाषण सुरू असताना विद्युत पुरवठा हे काही काळ खंडित झाला होता. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, श्याम उमाळकर, मुक्तारसिंग राजपूत, स्वाती वाकेकर, उषा चाटे, यांच्यासह ओबीसी संघर्ष समितीचे कल्याण दळे, दत्ता काकस यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, सोबतच या मेळाव्याला जिल्हाभरातून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुलढाणा जिल्हा भविष्यात ओबीसीसाठी एक बलस्थान निर्माण होईल
