जनतेज न्युज

बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतीची पालकमंत्र्यांकडून पाहणी….

प्रतिनिधी , नंदुरबार : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे शिवारातील शेतात गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव असलेल्या कापूस पिकाची पाहणी केली.
यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृर्षी अधिकारी निलेश भागेश्वर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी.खरबडे उपस्थित होते.

निसर्गांच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिसून येत असल्याने गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव झालेल्या शेतीचे सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी करावे, तसेच शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळे तसेच किटकनाशकांची फवारणी करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या. संकट काळात शासन शेतकऱ्यांसोबत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.