जनतेज न्युज

भाजप कार्यकर्त्यावर हल्ला करणारे हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल करत आरोपींचा सुरू केला शोध

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर तुटून पडले आहे. भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून सातत्याने शिवसेना नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. हे सर्व घडत असताना आज सकाळी जिल्हयाचे सोशल मिडिया प्रभारी मनोज कटके यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोळ्य़ात मिरचीची पूड टाकून त्यांना खाली पाडण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रने हल्ला केल्याची माहिती भाजप कार्यकत्र्यानी दिली आाहे. मनोज कटके यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान ज्या ठिकाणी मारहाण झाली त्या दुकानात आणि दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा नोंद करत सीसीटीव्ही च्या माध्यमाने आरोपींचा शोध सुरू केला आहे