प्रतिनिधी , सांगली : सत्ता प्राप्त करण्यासाठी येनकेन मार्गाचा उपयोग करायचा… पाहिजे त्या स्तराला जाऊन बोलायचं यावरून भाजप कोणत्या स्तराला गेलाय हे महाराष्ट्राला त्यानिमित्ताने कळलं आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगली येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.
भाजपचे नेते सध्या ज्यापध्दतीने आरोप करत आहेत. जी विधाने करत आहेत यावर जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भाजप किती खालच्या स्तरावर गेला आहे हे त्यांच्या रोजच्या विधानाने लक्षात येते आहे. मानसिक ताण आल्यावर भाजप कोणत्या स्तराला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची विधाने आहेत. लोकं पहात असतात. लोकांना सगळ्यांची योग्यता काय असते हे माहित असतं. दुर्दैवाने इतक्या खालच्या स्तराला जाऊनदेखील भाजपाला त्याबाबतीत काही वाटत नाही याबद्दल जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले.
