प्रतिनिधी , उल्हानगर चे भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शर्मा यांच्यावर क्षुल्लक वादातून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केल्याची माहिती जय शर्मा यांनी दिलीय.प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
उल्हासनगर कॅम्प-३ इंदिरा गांधी भाजी मार्केट परिसरात जय शर्मा खोली भाड्याने दिली आहे. भाडेकरू यांना काही महिन्यापासून रात्रीच्या वेळी सुमारास काही अज्ञात व्यक्तीं घराची कडी वाजवून त्रास देत असल्याची तक्रार जय शर्मा यांच्याकडे करण्यात आली होती. जय शर्मा आपल्या खोलीकडे गेले असताना दबाधरून बसलेल्या हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार करून गंभीर जखमी केले.जय शर्मा यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
