जनतेज न्युज

भारत मिशन अंतर्गत उघड्यावर शौच्यास जाणाऱ्या नागरिकांवर गुड मॉर्निंग पथकाकडून गांधीगीरीने कार्यवाही सुरू.

प्रतिनिधी , उस्मानाबाद : जिल्ह्यात सध्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उघड्यावर शौच्यास जाणाऱ्या नागरिकांवर गुड मॉर्निंग पथकाकडून गांधीगीरीने कार्यवाही सुरू आहे. मात्र, विविध शासकिय योजनेतून ग्रामिण भागात उभारलेल्या शौचालयाची दुरावस्था झाली असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रतिनिधीक स्वरूपात उस्मानाबाद तालुक्यातील १७ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या व महत्वपुर्ण ग्रामपंचायतीचा आढावा घेतला असता ही बाब समोर येथे की पुर्वी ५ ते ६ सार्वजनिक शौचालय होते. मात्र, सध्या तीनच शौचालय असून तेही गेल्या अनेक वर्षापासून बंद असल्याने त्याची दुरावस्था झाली आहे.