प्रतिनिधी , अमरावती : भाजपच्या विरोधात जे कोणी बोलेल त्यांच्यावर ईडीची चौकशी लावण्यात येत आहे. त्यामुळे ईडीची चौकशी म्हणजे लोकशाहीचा खून होत असल्याची टिका राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. ज्या भाजपच्या लोकांच्या अकाऊंटमध्ये अवैधरीत्या पैसे जमा झालेत, त्यांच्यावर ईडीची चौकशी का लागत नाही? ज्यांनी-ज्यांनी भाजपची सत्यता समोर आणली त्याच्यावर ईडीची कारवाई होत आहे. त्यामुळे देशाचं राजकरण अतिशय खालच्या स्तरावर जात असून, ईडी सोबतच शेतकऱ्यांचं सुद्धा राजकरण होत आहे,ज्या राजधानीमध्ये शेतकरी आंदोलनाला बसतात, त्याच ठिकाणी देशाचे प्रमुख दिपावली मणवितात, अशीही टिका यशोमती ठाकुर यांनी यावेळी केली आहे.
