जनतेज न्युज

पुण्यात अपंगांचे भंडारा उधळत आंदोलन सुरू.

प्रतिनिधी , पुणे : अपंग हक्क कायदा 2016 मध्ये अस्तित्वात आला. मात्र, त्याचा फायदा दिव्यांग लोकांना झालाच नाही. कायदा अस्तित्वात येऊन त्याची अंमलबजावणी झाली नाही. या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी दिव्यांग बांधव अपंग आयुक्त कार्यालयाबाहेर जागरण गोंधळ आंदोलन करत आहेत. ४ वर्ष होऊनही हा कायदा अस्तित्वात आला नसल्याने अनेक अडचणी आमच्या समोर आहेत. झोपलेल्या शासनाला जागं करण्यासाठी भंडारा उधळत हे आंदोलन आज पुण्यात करण्यात आलं.