जनतेज न्युज

भीमा कोरेगांव शौर्य दिनाचा सोहळा छोटेखानी साजरा होणार – राहुल डंबाळे

प्रतिनिधी , पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे येत्या एक जानेवारीला होणारा भीमा कोरेगांव शौर्य दिनाचा सोहळा छोटेखानी साजरा होणार असल्याची माहिती शौर्यदिन समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पञकार परिषदेत दिली आहे. सकाळी सात ते दुपारी बारा दरम्यान विविध कार्यक्रम सादर होणार असून उपमुख्यमंञी अजित पवार, केंद्रीय सामाजिक राज्यन्याय मंञी रामदास आठवले,आनंदराज आंबेडकर,जोगेंद्र कवाडे आणि विविध सामाजिक चळवळीचे नेतेही अभिवादन करण्यास येणार आहेत. भीमाकोरेगावच्या परिसरात 31 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू केली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवला जाणार आहे तसेच यावेळीस सभा घेण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.तसेच अभिवादन करण्याकरता काही लोकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने पासेसही दिले जाणार आहेत अशी माहिती राहुल डंबाळे यांनी यावेळी दिली.