प्रतिनिधी , मुंबई : आज मंत्रिमंडळ आढावा बैठक पार पडली.यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी, ३१ डिसेंबर आपल्याला यंदाचं वर्ष साधेपणाने साजरे करावे लागेल असे मत व्यक्त केले.हॉटेल्स ११ नंतर बंद होतील.सर्व लोकांनी नियमांचं पालन करावं आणि पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहनही अनिल देशमुख यांनी केलं.
याचसोबत संजय राऊत यांच्या पत्नीला आलेल्या ईडी नोटीसीवर बोलताना हे सुडाचं राजकारण सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
