जनतेज न्युज

भैय्यासाहेब इंदिसे यांनी ठाणे जिल्हाप्रशासनाला दिले दोन हजार पीपीई किट

प्रतिनिधी , ठाणे : कोरोनाचा नवीन स्ट्रेन विषाणू आलेला आहे. या नव्या स्ट्रेन विषाणू बाधीत असलेला एक रुग्ण डोंबिवलीमध्ये सापडला आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पीपीई किटसारख्या साधनांची कमतरता भासू नये, यासाठी रिपाइं एकतावादीचे युवा नेते, माजी स्थायी समिती सभापती भैय्यासाहेब इंदिसे यांनी कोरोना विशेषतज्ज्ञ डॉ. दिलीप पवार यांच्या माध्यमातून अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्याकडे 2 हजार पीपीई किट सुपूर्द केले आहे.
यावेळी वैदेही रानडे म्हणाल्या की, भैय्यासाहेब इंदिसे आणि डॉ. दिलीप पवार यांनी दिलेली ही मदत मोलाची आहे. आजही ग्रामीण भागात साधनांची कमतरता आहे. या मदतीमुळे ही कमतरता भरुन निघण्यास मदत होणार आहे. भैय्यासाहेब इंदिसे यांनी, जिल्हा प्रशासनाकडे आज दोन हजार पीपीई किट सुपूर्द केल्या आहेत. येणाऱ्या काळातील हे संकट पाहता आणखी सहाय्य करण्याची आमची तयारी आहे. जिल्हाप्रशासनाने सांगितले तर डॉ. पवार यांच्या मदतीने आम्ही व्हेंटीलेटर्सही उपलब्ध करुन देऊ,असे भैय्यासाहेब इंदसे यांनी सांगितले. तर, डॉ. पवार यांनी आगामी काळात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानेच ग्रामीण भागातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य सेवेला साधनांची कमतरता भासू नये, यासाठी आम्ही सदैव मदत करण्यास सज्ज आहोत, असे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्याकडे हे पीपीई किट सुपूर्द केले. याप्रसंगी वंचित आघाडीचे नेते राजाभाऊ चव्हाण, डॉ. किशोर बोरीचा तसेच आदी मान्यवर उपस्थित हो