प्रतिनिधी , मुंबई : मराठा आरक्षणावर आलेली स्थगिती आणि राज्यसरकारने हक्काचं आरक्षण न देता दिलेली EWS ची सवलत या संदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि छावा संघटनेचे प्रतिनिधी मंडळ आज दुपारी १२ वाजता राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात गेले होते.यावेळी राज्यपालांची चर्चा करून मराठा आरक्षणाबाबत राज्यपालांकडे मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी मागणी केली.यावर राज्यपालांनी सकारात्मक उत्तर या प्रतिनिधींना दिले आहे.
