जनतेज न्युज

एक दिवस असा येईल की भाजप स्वतः सांगेल हे सरकार २०२४ पर्यंत चालेल-महेश तपासे

प्रतिनिधी , मुंबई : आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.यावेळी त्यांनी भाजपावर टिकास्त्र डागलं.कृषी कायद्यावर बोलताना त्यांनी,’भारताचे कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर हे देशाची दिशाभूल करतायेत’,अशी प्रतिक्रिया दिली.
याचसोबत भाजपच्या सरकार पडण्याच्या दाव्यावरही तपासे यांनी भाष्य केले’.एक दिवस असा येईल की भाजप स्वतः सांगेल हे सरकार २०१४ पर्यंत चालेल’,अशी प्रतिक्रिया महेश तपासे यांनी दिली.