प्रतिनिधी , नांदेड : तालुका विधी सेवा समितीच्या वतीने भोकर इथल्या न्यायालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराला जिल्ह्यातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांनी हजेरी लाऊन प्रोत्साहन दिले. या रक्तदान शिबिरात कर्मचारी, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी सहभाग नोंदवत रक्तदान केलय. जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची प्रतिक्रीया जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी दिली.
