जनतेज न्युज

भोकरदन येथील डॉक्टर मित्रांनी केले कोविड केअर सेंटर सुरू… कोरोना बाधित रुग्णांना मिळणार सर्व सुविधा…

प्रतिनिधी , जालना : भोकरदन परिसरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे, रुग्णना उपचारासाठी सिल्लोड , जालना किंवा औरंगाबाद येथे उपचार करीता जावे लागत आहे. तेथे सुद्धा त्यांना ऑक्सिजन बेड ची सुविधा मिळणे कठीण झाले आहे.मोठ्या शहरांमध्ये कोरोना वर उपचार पद्धती खुप महागडी असल्यामुळे सामान्य जनता हतबल झाली आहे.लॉक डाउन मुळे आधीच जीव टांगनीला आला आहे, भारतात प्रती व्यक्ती उतपन्न घसरले आहे त्याच वेळी एकाच घरात 3 ते 4 व्यक्ती एकाच वेळी बिमार पडत आहे. दुष्काळात तेरावा महिना अशी घत सामन्याची झाली आहे. वरून लाख रुपयांची हॉस्पिटल ची बिल, महागडी औषधी, प्रशासनचे दुर्बळ व्यवस्थापन या मुळे सामान्य जनता भरडून निघाली आहे. शेतकऱ्यां समोर पेरणी पूर्व शेती मशागत आहे लॉक डाउन मिळे मागील वर्ष भर शेती उत्पनाना भाव नाही.लाखो लोकांचे रोजगार गेले.व्यवसाय ठप्प झाले. या सर्व परिस्थिती मध्ये गाव सोडून बाहेर गावी उपचार करणे अवघड आहे.
ही दुरवस्था भोकरदन येथील डॉक्टरांनी दूर करून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार करून सर्व सुविधांनी युक्त साई कोविड केयर सेंटर सुरू केले आहे.डॉ कृष्णा कोरडे(MBBS, MD) डॉ अभिलाष गोलेच्छा (MBBS, MD) डॉ नितीन इंगळे (MBBS) डॉ रवींद्रकुमार वाघ (BAMS DCH) डॉ नासीब खान (BUMS ) डॉ विठ्ल नवल (BHMS) या सर्व डॉक्टरांनी पुढाकार घेऊन छत्रपती शिवजी महाराज पुतळ्याजवळ , भाग्य नगर, रविदीप हॉस्पिटल समोर साई कोविड केयर सेंटर चालू केले आहे, या सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड ची मुबलक सुविधा असून cpap आणि bipap डिजिटल x RaY मशीन, ECG, Ambulance या सारख्या सुविधा कोविड पेशंट ला जीवदान देणाऱ्या आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिल्याप्रमाणे तिसरी लाट भारतात लवकरच येणार आहे यामध्ये कमी वयापासून लहान बाळापासून युवा जास्त प्रमाणात बाधित होणार आहेत .लहान मुलांच्या कोविड साठी सेवा देणारे हॉस्पिटल फार कमी आहेत. त्या दृष्टीने सुद्धा हे हॉस्पिटल उत्कृष्ट काम करेल या नियतीने सर्व व्यवस्थापन चोख ठेवण्यात आलेले आहे तशी सर्व सुविधा हॉस्पिटलला करणयात आली आहे.करोणा हा लहान बाळापासून तर वृद्धा पर्यंत सुद्धा होतो, हे विचारात ठेऊन हे कोविड केयर सेंटर सर्वांना योग्य ती आणि उच्चतम चिकित्सा देईल, हेच आमचे ध्येय या डॉक्टर मित्रांचे आहे.