जनतेज न्युज

खतांच्या वाढीव किंमतीसाठी केंद्र सरकार सर्वस्वी जबाबदार आहे – अजित पवार

प्रतिनिधी , बारामती : शेतकरी वर्गाला आवाहन केले आहे की या वेळेस स्फुरत आणि बालांशच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांनी युरियाकडे वळू नये यासाठी त्यांनी एनपीके १०’१०’२६,१९’१९ चा वापर केला पाहिजे,खतांच्या किमती वाढल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती केली आहे जर खतांच्या किमती वाढल्या असतील तर त्याच्या पेक्षा कमी किमतीमध्ये इतर खते उपलब्ध करून द्यावीत…
राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाने एका मुलाचे अपहरण केले आहे असा प्रश्न विचारला असता यामध्ये कालच पुण्यामध्ये मी स्वतः पोलिस अधिकाऱ्यांची चर्चा केली असून या मुझे जो कोणी दोषी असेल तर दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत..
म्युकर मायकोसीसच्या रुग्णांचे प्रमाण बारामती मध्ये वाढले आहे यावर बारामती मध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये या आजारांची रुग्ण संख्या वाढत आहे यामुळे या आजारावर कशा प्रकारे नियंत्रण मिळवता येईल यासाठी पुण्यामध्ये देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे तसेच टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांबरोबर देखील सविस्तर चर्चा केली आहे यामुळे मायकोसिसला लागणारा खर्च मोठ्या प्रमाणावर असला तरी तो नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत
लसीकरण वारंवार बंद पडत आहे यावर बोलताना अजित पवार म्हणाले की जेवढी लस देशाला मिळाला पाहिजे तेवढी लस दुर्दैवाने उपलब्ध होत नाही म्हणून कालच पुण्यामध्ये भारत बायोटेक कंपनीला जागा उपलब्ध करून दिली असून लवकरात लवकर त्यांचे उत्पादन सुरू होईल एकदम मागणी वाढल्याने नाईलाजाने १८ ते ४५ वर्गातील नागरिकांचे लसीकरणाचे काम थांबवावे लागले आहे मात्र लस उपलब्ध झाल्यानंतर अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करून करण्याचे काम सुरू केले जाईल