जनतेज न्युज

तीन दिवस केडीएमसी चे लसीकरण ठप्प दोन केंद्रावर मिळणार फक्त दुसरा डोस

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : राज्य सरकारकडून मिळालेल्या सूचनेनुसार कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील १८ ते ४४ वयोगटातील स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.उद्या १५ मे रोजी कल्याण पूर्व भागातील प्रबोधनकार ठाकरे शाळेतील लसीकरण केंद्रावर आणि डोंबिवलीतील क्रीडा संकुलातील लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीच्या केवळ दुसरा डोससाठी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन्स वर्कर्स आणि ४५ वर्षावरील नागरीकांसाठी लसीकरणाची व्यवस्था उद्या सकाळी 1क् वाजल्यापासून लस साठा उपलब्ध असेर्पयत करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस देण्याचा कालावधी ६ ते ८ आठवडय़ावरुन १२ ते १६ आठवडे असा केला असल्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले असलतील अशा नागरीकांनी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस सरकारकडून लसीचा साठा उपलब्ध झाल्यावर मिळणार आहे.