जनतेज न्युज

भोजगावच्या वाहुन गेलेल्या पुलाने घेतला आणखी एक बळी

निगरगट्ट लोकप्रतिनिधी व प्रशासन आणखी किती बळी घेणार..?

प्रतिनिधी , गेवराई : गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील पुलाने आणखी एक बळी घेतल्याचे आज सकाळी उघडकीस आले भोजगाव येथील निकिता संत या मुलीच्या सावडण्याचा कार्यक्रम आज होता आणि त्यानिमित्त नातेवाईकांसह सुदर्शन संदिपान संत ( ३८ ) हे देखील तिथे आले होते मात्र तिथे जाण्यासाठी भोजगाव येथील वाहुन गेलेला पुल ओलांडून जावे लागते पुलावरून जात असताना सुदर्शन संत यांचा पाय घसरून तोल गेला व ते अमृता नदीमध्ये पडले ग्रामस्थांनी वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र पाण्याच्या प्रवाहात ते वाहत धोंडराई नजीकच्या पुलाजवळ आले व त्यांचा मृतदेह तिथे आढळून आला.भोजगाव येथील ही पहिली घटना नसुन याआधीही अशा घटना भोजगाव मध्ये घडलेल्या आहेत विद्यमान लोकप्रतिनिधी व माजी लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी वाहुन गेलेल्या पुलाची पाहणी करून दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले मात्र सत्यपरिरिस्थीतीत हा पुल दुरुस्त झालेला नाही त्यामुळे एका दुःखातुन सावरत नाही तर दुसरे दुःख भोजगावकरांवर विशेषतः संत कुटुंबीयांवर आले आहे.मयत सुदर्शन संत हे भोजगाव ग्रामपंचायत चे पाणीपुरवठा कर्मचारी होते.या घटनेमुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत.