प्रतिनिधी , राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ हे धुळे दौऱ्यावर आले असताना यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, राज्यामध्ये ओबीसींच्या 55 ते 56 हजार जागा असून ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, केंद्र सरकारने इंपेरिकल डेटा देण्यास नकार दिला आहे. त्यासाठी आमची सातत्याने लढा सुरू राहील. 50 टक्के संदर्भात म्हटले की, संविधानामध्ये कुठेही म्हटलेले नसून 27 टक्के आरक्षण शाबूत राहावी एवढीच आमची इच्छा आहे.
ओबीसींच्या आरक्षणावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द व्हावा यासाठी राज्य सरकार कोर्टात जाणार नसल्याची माहिती छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मी गृहमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या संदर्भात छगन भुजबळ यांना विचारणा केली असता बाळासाहेब ठाकरे यांना कुठलाही त्रास होऊ नये हाच आमचा उद्देश होता, यासाठी मातोश्रीला जेल म्हणून घोषित करण्याचा त्यावेळी निर्णय घेतला होता अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
