प्रतिनिधी ,राज्यातील शेतकरी कष्टाने आपले पीक पिकवतो मात्र व्यापारी काटेमरीतून त्याची फसवणूक करत आहे असे प्रकार वारंवार घडत आहेत त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या उसाची एफ आर पी देखील कारखान्यांनी थकवली आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे शेतकऱ्यांची पिळवणूक करून शेतकऱ्याच्या मालाची काटेमरी करणाऱ्या आणि एफ आर पी थकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत
राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे आज सातारा दौऱ्यावर असून म्हसवे येथील शेतकऱ्यांची सदिच्छा भेट घेत हितगुज साधले यावेळी बोलताना त्यांनी हे आदेश दिले आहेत
