प्रतिनिधी , वर्धा: पालकमंत्र्यांना राजीनामा देण्याच्या घोषणा
पेट्रोल पंप हटवल्याशिवाय मागे हटणार नाही: आंदोलनकर्ते
यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्याची भूमिका : मोहन राईकवार
26 सप्टेंबरला पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ साखळी उपोषण करण्यात आले,,,पोलिसांनी काही आंदोलकांना यावेळी ताब्यात घेतले… वर्धा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पेट्रोल पंप हटविण्यात यावा यासाठी आंबेडकरी अनुयायींकडून अनेकदा आंदोलने करण्यात आली..आणि आणखी उग्र करण्याची भूमिका असणार आहे..
या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज या साखळी उपोषणाला सुरवात झाल्यावर पोलीस सुध्दा घटनास्थळी दाखल झाले..अनेक आंदोलनकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती..पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असताना कार्यकर्त्यांची घोषबाजी सुरू होती
