जनतेज न्युज

मंत्री छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला. ताफ्यातील गाडीतून अपघातग्रस्ताला पोहचविले रुग्णालयात

प्रतिनिधी, नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील कार्यक्रमातून परतत असतांना नाशिक पुणे महामार्गावर चारचाकी आणि दुचाकीमध्ये अपघात झालेला होता. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी आपला वाहनाचा ताफा थांबवित तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली. त्यांनी आपल्या कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने आपल्या ताफ्यातील गाडी अपघातग्रस्ताला उपलब्ध करून देत तातडीने सिन्नर येथील रुग्णालयात पाठविले.