जनतेज न्युज

मध्यवर्ती बस स्थानकावर संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शने

प्रतिनिधी, औरंगाबाद : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी एक तारखेपर्यंत कामावरती हजर व्हावे नसताना नवीन भरती करण्यात येईल अशी धमकी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आज रोजी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर संपावर असलेले एसटी कर्मचाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधात घोषणा देत निदर्शने केली असून जेव्हा पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करीत नाही तेव्हापर्यंत आम्ही कामावर हजर होणार नाही अशी प्रतिक्रिया संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज रोजी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. सदरील संपा संदर्भात न्यायालयात पाच तारखेला निकाल येणार असून राज्य शासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई करू नाही असे आदेश दिलेले असताना सुद्धा उप मुख्यमंत्री अजित दादा पवार हे एसटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. जेव्हा पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीनीकरण करून घेत नाही तेव्हापर्यंत संप सुरूच असणार असल्याची ही यावेळी प्रतिक्रिया संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज रोजी दिली आहे. यावेळी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत महाराष्ट्र परिवहन महामंडळाची राज्य शासनात विलीनकरण करण्याची मागणी करीत राज्य शासन आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधात यावेळी घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली आहे.