प्रतिनिधी , सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेकडून शहरातील एसएफसी मेगा मॉल परिसरात आग नियंत्रणाचे प्रात्यक्षिक घेणेत आले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांच्या टीमकडून हा मॉगड्रिल घेणेत आला.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिका क्षेत्रात मोठ्या व्यावसायिक इमारती, मॉल , चित्रपटगृहे आदी परिसरात जर आगी सारख्या घटना घडल्या तर त्यावर तातडीने उपाययोजना कशा कराव्यात यासाठी आवश्यक यंत्रणा अग्नीरोधक यंत्रणा योग्यरित्या कार्यरत आहेत का यासाठी मनपा अग्निशामक विभागाकडून स्टेशन चौकातील एसएफसी मेगा मॉलमध्ये आग लागल्यानंतर ती कशी नियंत्रणात आणावी याचे प्रात्यक्षिक वजा मॉग ड्रिल घेणेत आले. यामध्ये मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यानी सहभाग घेतला. तसेच मनपाच्या दोन अग्निशमन बंबाबरोबर आठ जवानांनी या मॉग ड्रिल मध्ये सहभाग घेतला.
