जनतेज न्युज

मनपा विरोधात शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियनची सलग पाच दिवस पदयाञा

प्रतिनिधी , औरंगाबाद : एन-११, एस.बी.ओ.ए. शाळेसमोरील पथविक्रेत्यांवर हल्ला करणार्या मनपा अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाचीकारवाई करुन निलंबीत करा या इतर मागण्यांसाठी शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियन संलग्न आयटक व नॅशनल हाॅकर्स फेडरेशन आजपासून  9 मार्च 022 पासुन रोज एन 11 ते मनपा टाऊन हॉल कार्यालय अशी पदयाञा काढण्यात येत आहे. निवेदन देण्यात येत आहे पण मनपा प्रशासन निर्दयी आणि ढीम्मच आहे.याबाबत असे की ,  पथविक्रेता उपजीवीका संरक्षण व विनिमयन कायदा २०१४ अंतर्गत पथविक्रेत्यांच्या संरक्षणाची जबाबदारी म.न.पा. प्रशासक / आयुक्त यांची अस्थाई शहर पथविक्रेता समितीचा अध्यक्ष या नात्याने आहे. काही-काही दिवसांच्या अंतराने म.न.पा. अतिक्रमण विभागाचे पथक कायद्याचे उल्लंघन करून पथविक्रेत्यांवर हल्ले करीत आहे. आम्ही कायद्याला मानत नाही, असे खूलेआम म्हणत आहेत. दि. ८ मार्च २०२२ रोजी दुपारी १२ च्या दरम्यान श्री. मझहर यांच्यासह म.न.पा.औरंगाबाद अतिक्रमण विभागाच्या पथकाने एन-११, एस.बी.ओ.ए. शाळेसमोरील पथविक्रेत्यांवर हल्ला केला. अभिषेक बनकर या पथविक्रेच्याची रु. १२०००/- (बारा हजार रुपये) किमतीची हातगाडी, रुपये १४००/- (चौदाशे रुपये) किमतीची छत्री, दोन प्लास्टीक  व ३ स्टीलचे टोपले,१२००/- (बाराशे रुपये) किमतीचे तसेच १६०००/- (सोळा हजार रुपये) किमतीचा मोबाईल ज्यात ८००७१७८०१६ (एअर टेल) क्रमांकाचे सीम असणारा रेडमी नोट-५ कंपनीचा मोबाईल उचलून नेला. संदिप बोचरे  या पथविक्रेत्याला तो व्हीडीओ करतो म्हणून चापटाने मारले व जाधव नावाच्या महिलेला हाताच्या कोपर्‍याचा खुंबा मारला. संजय गायकवाड या पथविक्रेत्याची १२०००/- (बारा हजार रुपये) किमतीची हातगाडी वरील मझहर यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सोबतच्या  कर्मचार्‍यांनी उचलून नेली. याबाबतची पोलीस तक्रार संबंधित पथविक्रेत्यांनी तत्काळ केली आहे.दि. २८-२-२०२२ रोजी झालेल्या अस्थाई शहर पथविक्रेता समितीच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त म.न.पा. औरंगाबाद श्री. सौरभ जोशी यांनी कायद्याचे उल्लंघन होणार नाही व अतिक्रमण विभाग पथविक्रेत्यांवर कारवाई करणार नाही, अशी तोंडी हमी दिली होती. शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन मनपा कडुन वारंवार संवादाची व सहकार्याची अपेक्षा करीत आहे. कायद्याला मी मानत नाही, असे कोणत्याही व्यक्तीला म्हणता येत नाही, कायद्याविरुद्ध वागता येत नाही. कोणतीही लेखी नोटीस न देता, पंचनामा न करता कोणत्याही लोकसेवकाला कोणाच्याही वस्तू जप्त करता येत नाही. कालची घटना वरील कथित प्रक्रिया पूर्ण न करता करण्यात आली. वरील प्रमाणे चूकीचा प्रकार करताना श्री. मझहर सोबत आलेले कर्मचारी गळ्यात लटकवलेले ओळखपत्र शर्टात लपवत होते. व्हीडीओ करणार्‍यावर हात उचलत होतेे, पथविक्रेत्यांचे मोबाईल हिसकावून घेऊन व्हीडीओला डीलीट करीत असतील तर हे योग्य नाही. ते जर कायदेशीर काम करीत असतील तर त्यांना घाबरण्याचे कारण काय? ओळखपत्र लपवू नये, नोटीस द्यावी, पंचनामा करावा. शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन संलग्न आयटक व नॅशनल हॉकर्स फेडरेशन मनपाला कायदेशीर प्रक्रीया राबवण्यासाठी पूर्ण सहकार्य करीत आहे. परंतू पथविक्रेत्यांवर बेकायदेशीरपणे हल्ले झाल्यास, त्यांच्या पोटावर लाथ मारल्यास युनियन सहन करणार नाही. वरील प्रकाराचा युनियन निषेध करते व जोपर्यंत  मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आजपासून रोज एन-११ ते म.न.पा. टाऊन हॉल कार्यालयापर्यंत पदयात्रा काढुन जाहीर निषेध केला जाणार आहे गेली पाच दिवस अतिरिक्त मनपा आयुक्त भालचंद्र नेमाणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटल आहे. 

         १)  एन-११, एस.बी.ओ.ए. शाळेसमोरिल पथविक्रेत्यांवर हल्ला करणारे म.न.पा. कर्मचारी श्री. नझर व इतरांची खातेनिहाय चौकशी करा व चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबीत करा.

२) पथविक्रेता अभिषेक बनकर, संजय गायकवाड यांचे वर उल्लेख केल्याप्रमाणे हातगाडी व इतर  साहीत्य तत्काळ परत देण्याचे आदेश द्यावेत व दि. ८-३-२०२२ पासून वरील हातगाडी व सामान द्यायला दिरंगाई करेपर्यंत दररोज १०००/- रुपयेप्रमाणे वरील पथविक्रेत्यांना नुकसान भरपाई संबंधित कर्मचार्‍यांच्या पगारातून वसूल करून सदर पथविक्रेत्याला द्यावे.३) म.न.पा. अतिक्रमण विभागाला पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनिमयन कायदा २०१४ च्या कलम २७ व कलम ३३ प्रमाणे पथविक्रेत्यांवर कारवाई करण्यास मज्जाव करणारे पत्र द्यावे व त्याची प्रत युनियनला द्यावी.४) अस्थाई शहर पथविक्रेता समितीचे अध्यक्ष म्हणून वर उल्लेख केलेल्या पथविक्रेत्यांवर झालेल्या हल्ल्याची पोलीस तक्रार करावी या मागण्यांचा समावेश आहे.  ही पदयाञा एन 11 एस.बी.ओ.ए शाळेपासुन, टी व्ही सेंटर, पोलीस मेस, कटकट गेट, मार्गे टाऊन हॉल मनपा कार्यालय अशी पदयाञा काढण्यात येत आहे रोज 4 पथविक्रेते मागण्यांचे फलक घेऊन जवळपास 8 किलोमीटर चालत येतात.  या संपूर्ण मार्गावरील लोक या पथविक्रेत्यांबद्दल हळहळ व्यक्त करीत आहेत.  गेल्या पाच दिवसांपासून 53 कुटुंबाची उपासमार होत आहे व आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांची कायदेशीर जबाबदारी असतांनाही त्यांना या प्रश्नावर लक्ष द्यायला वेळ नाही . रविवार असतानाही पदयाञा आंदोलन करण्यात आले कारण रविवारी भुकेला सुट्टी नसते. त्यामुळे हा प्रश्न चिघळणार असेच दिसते. नाईलाजास्तव युनियनला आक्रमकभुमिका घेत मनपा टाऊन हॉल कार्यालया च्या गेटसमोर  भाजी बाजार भरवावा लागेल असा इशाराच देण्यातयेतआहे. पदयाञेत अॅड अभय टाकसाळ,  वाल्मिक सोनवने, अभिषेक बनकर, पुष्पाबाई सुर्यवंशी, हीराबाई गोसावी, दत्तू वाघ, दिलीप भवरे, संदीप पांचाळ, संदीप बोचरे, संतोष घुगे, संजय गायकवाड, क्रुष्णा मोगल, राजु हिवराळेसागर धुंधकरी , रेखा मेघुने, जगन वाघ, कविता सुर्यवंशी, पंडीत जाधव, पदमाकर काथार, गोदावरी मिसाळ, बाळुबाई अंभोरे, लक्ष्मी घुगे, , संतोष गाडेकर, कारभारी आगळे, निर्मला पाटील, सुरेखा काळे, दिलीप बावणे, संजय गायकवाड, जयश्री थोटे, सुरेखा काळेहे सहभागी झाले.  मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांना कळवतो असे आश्वासन भालचंद्र नेमाणे यांनी दिले होते. त्यानंतर भालचंद्र नेमाणे यांच्याकडुन कोणताही निरोप मिळालेला नाही .