प्रतिनिधी , नवी मुंबई : इंडियन प्रिमिअर लिग अर्थात आयपीएल २०२२ च्या सामन्यांचं वेळेपत्रक नुकतेच बीसीसीआयने जाहीर केले असून २६ मार्चपासून मुंबईच्या वानखेडे मैदानात यंदाच्या आयपीएल सामन्यांना सुरुवात होणार आहे. यंदाचे आयपीएल स्पर्धेसाठी यजमान शहर म्हणून नवी मुंबई सज्ज झाले असून दि. २७ मार्च ते १८ मे या कालावधीत नवी मुंबईतील डि.वाय. पाटील स्टेडीयममध्ये आयपीएलचे तब्बल २० सामने खेळविण्यात येणार आहेत.
