जनतेज न्युज

महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

प्रतिनिधी, बुलडाणा : महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून काँग्रेस सतत केंद्र सरकारला धारेवर धरत आहे घेराव करत आली आहे. ,महागाई आणि बेरोजगारीच्या निषेधार्थ काँग्रेस आज देशव्यापी आंदोलन पार पडले. बुलढाण्यातही जयस्तंभ चौकात काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले व यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदवत घोषणाबाजी केली आहे. तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसचे वतीने आज शहराध्यक्ष दत्ता काकस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.