जनतेज न्युज

महानगरपालिका क्षेत्रात 11 ते सकाळी 6 पर्यंत महापालिका क्षेत्रात निर्बंध – आयुक्त इक्बाल चहल.

प्रतिनिधी , मुंबई : कोव्हिड व्हायरची न्यू स्ट्रेनचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता खबरदारीचा इलाज म्हणून रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.
उद्या रात्रीपासून एकही फ्लाईट भारतात येणार नाही. मात्र जी लोक आलेली आहेत किंवा येणार आहेत त्यांना सक्तीने क्वारंनटाईन करण्यात येईल. एकही पॅसेंजर डायरेक्ट घरी जाणार नाही. लंडनहून साधारण १ हजार प्रवाशी परत येतील. त्यांची सगळी सोय केली जाईल. त्यांची सगळी टेस्ट करून क्वारंनटाईन केल जाईल. UK आणि मिडल ईस्टमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना हा नियम लागू
परदेशातून येणाऱ्या लोकांसोबत काम करणारे सर्व कर्मचारी हे पीपीई किट घालूनच काम करतील. ५ पेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊ नये. गरजू वस्तूवर कोणताही परिणाम होणार नाही.
रात्री ११ पर्यंत नियमात कोणताही बदल नाही. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत महापालिका क्षेत्रात निर्बंध. हे वर्ष नॅार्मल नाही. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर नियंत्रण ठेवाव लागेल. अशी माहिती BMC आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली.