प्रतिनिधी , अमरावती : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोर आज मराठा सेवा संघ, सभाजी बिग्रेडच्या,जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने एक दिवशीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले, केंद्र सरकारने लागू केलेले कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांनी केला, त्यामुळे हे काळे कायदे रद्द करून दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाचा तोडगा केंद्र सरकारने काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली तर यावेळी शेतकरी राजासाठी अन्नत्याग आंदोलन करत केंद्र सरकारचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला
