जनतेज न्युज

भाजपमध्ये आणखी नेत्यांचा प्रवेश होणार, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट.

प्रतिनिधी , नाशिक : पक्षापासून दूर गेलेले सानप आज पुन्हा एकदा भाजपात परतले आहे. कुंभमेळ्यांच्या वेळी सानप यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं. सगळ्या अडचणी दूर करत कुंभमेळा चांगल्या प्रकारे पाडला होता. सानप हे जमिनीशी जोडलेले नेते आहेत. कुणीही वाद करण्याचं कारण नाही. जुने-नवे अशी कोणतीही अडचण येणार नाही. आपल्याला पक्ष मजबूत करायचा आहे. नाशिक भाजपाचा बाल्लेकिल्ला झाला आहे. त्याच ताकदीने पक्ष मजबूत करायचा आहे भारतीय जनता पार्टी मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमधील अनेक नेते भाजप मध्ये यायला उत्सुक आहे लवकरच अनेक नेत्यांचा भाजपमध्ये देखील प्रवेश होणार आहे विरोधकांकडून भाजपमधील अनेक नेत्यांच्या संपर्कात असल्याचा बाऊ करण्यात येते मात्र वास्तवात असं काहीही नाही उलट तिन्ही पक्षातील अनेक नेते भाजप मध्ये यायला उत्सुक आहे असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
नाशिक महापालिका निवडणुका जवळ येत असताना शिवसेनेला धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत भाजपात प्रवेश केला आहे. सानप यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलं. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सानप यांचं स्वागत केलं.