जनतेज न्युज

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने राज्यव्यापी संप

प्रतिनिधी, नांदेड :  आज शंकरराव चव्हाण वैद्यकीय शासकीय हॉस्पिटल येथे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने राज्यव्यापी विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे पुढील प्रमाणे कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत गेली परिचारिका सर्व स्तरावरील 100% पदोन्नती पद निर्मिती ओपन भरती न करता कायमस्वरूपी भरती पद करण्यात यावी केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करावा यासाठी आम्ही दोन दिवसीय संप करत आहोत आमच्या मागण्या त्वरित प्रशासनाने मान्य कराव्या अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.