प्रतिनिधी , महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गामध्ये 6000 हजार 200 पदच्या भरतीमध्ये त्या परीक्षेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे सर्व महाराष्ट्राने पाहिलेला आहे ह्या गोंधळात 8 लाख विद्यार्थ्यांना याचा फटका बसलेला आहे हे विद्यार्थी कोण आहेत हे विद्यार्थी या महाराष्ट्रातील गरीब समाजातील मातंग समाजाचे असो ओबीसीचे भटक्या मुक्त समाजाची मराठा समाजातील गरीब शेतकऱ्यांची मुले आहेत आणि त्यांच्याबद्दल अशा प्रकारची परीक्षा रद्द व्हावी वास्तविक पाहता प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षा फॉर्म भरून चारशे तीस रुपये भरले होते आणि परीक्षा फी शंभर रुपये असे पाचशे तीस रुपये भरलेले आहेत असे प्रत्येक विद्यार्थ्याकडून महाराष्ट्र शासनाने भरून घेतले असे जवळपास साडे 42 कोटी जमा करून घेतले असं असताना सुद्धा हे अशा प्रकारे करणे हे महाराष्ट्र शासनाला भूषणकार नाही ज्या अधिकाऱ्यांनी ब्लॅकलिस्ट कंपनीला हे काम दिलं होतं त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी अण्णा शेंडगे यांनी सरकारला केलेली आहे
