प्रतिनिधी , नागपूर : महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन इतके दिवस झाले कुठलही आंदोलन महाराष्ट्रात झाले नाही,काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत आहेत, शेतकऱ्यांना गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत, शेतकऱ्यांना चुकीच्या गोष्टी सांगण्यात येत आहेत,आणि आता जे लोकं या मोर्चाच्या निमित्ताने मंचावर जात आहेत त्यांना माझा सवाल आहे काँग्रेस पक्षाने आपल्या 2019 च्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की बाजारसमित्या रद्द करा आणि आम्ही सत्तेत आलो तर बाजारसमित्या रद्द करू त्यांनी आता उत्तर दिलं पाहिजे,
मी मुख्यमंत्री असताना आदिवासी संघटना आल्या होत्या मी शब्द दिला होता की नाही नागपुरातली प्राणी संग्रहालय पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्याला गोंडवाना नाव देऊ.आमचा बाळासाहेबांच्या नावाला विरोध नाही आहे.पण प्रत्येक गोष्टीला नाव देत अस्तानी एक प्रोटोकॉल निश्चित केला पाहिजे.
