जनतेज न्युज

महाविकास आघाडी सरकार पडण्यासाठीच भाजपकडून मंत्र्यांच्या विरुद्ध षडयंत्र – डॉ. सुरेश जाधव

प्रतिनिधी, सातारा : महाराष्ट्रामध्ये तीन पक्ष मिळून उभारण्यात आलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठीच भाजप महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकून त्यांच्याविरुद्ध षडयंत्र करत आहे भाजपकडून सुरू असलेल्या या खोट्या षडयंत्राचा काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला असून महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांच्या पाठीशी काँग्रेस देखील ठामपणे उभे असलेल्या चित्र आता पाहायला मिळत आहे त्यामुळेच सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंत्री नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईचा सातारा काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.