प्रतिनिधी , या राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचे मिळून सरकार सत्तेवर आले आहे मात्र या सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलीच इज्जत मिळत नाही काँग्रेसला अगोदर निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने झिडकारले आहे आणि आता महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील झिडकारले जात आहे असा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे तो अगदी तंतोतंत खरा आहे कारण कॉंग्रेसच्या मंत्र्यांना आमदारांना या सरकारमध्ये निधी मिळत नाही अशी ओरड काँग्रेसमधीलच आमदारांकडून केली जात आहे यामुळे काँग्रेसला या महाविकास आघाडी सरकारमध्ये झिडकारले जात असल्याचे वक्तव्य सत्यच असल्याचे पांडुरंग कचरे यांनी बोलून दाखवले आहे..
