प्रतिनिधी , सांगली : शिवसेना युती असताना ही अशी खेचाखेची होत होतीच, आय लव्ह यु म्हणायचं आणि नंतर लफडी करायचं असलं होत राहणारच, अश्या शब्दात पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र मी डब्बा आहे, आणि उद्धव ठाकरे हे माझे इंजिन आहेत, त्यामुळे तू जहां मुझसे कहेगी मै उधर जाऊंगा अस ही गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केले. तीन पक्षाचे सरकार म्हटल्यानंतर केतकीची ही होतच राहणार, मात्र अन्य दोन पक्ष आपल्या पक्षाचा विस्तार करत आहेत, तसाच आम्ही सुद्धा आमच्या पक्षाचा विस्तार करत राहणारच, सर्वसामान्य शिवसैनिका वर कुठेही अन्य होणार नाही याची काळजी आम्ही घेणारच, अस ही पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
