जनतेज न्युज

मावळ मधील नगरिकानो जमिनी सांभाळा. नाहीतर शोधालही मावळे मिळणार नाही…

प्रतिनिधी , मावळ: पुणे जिल्ह्यातील मावळ हा भाग जमिनीमुळे अवघ्या महराष्ट्रात हॉट प्लेट म्हणून ओळखला जात आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होत असून हात लावाल तिथं चटका बसत आहे. त्यामुळे शेती राहणार का नाही असा प्रश्न आहे. डेव्हलपमेंट होत असल्याने इथे नवीन राहणाऱ्याची संख्या मोठी आहे शिर्डी येथे अशीच अवस्था होती. तिथं आता मूळचे माणसं शोधून सापडत नाहीत. अशीच अवस्था आता मावळ ची होऊ शकते, त्यामुळे जमीन विकून चार दिवस महागड्या मोटारीत फिराल पण नंतर काय आत्ताच काळजी घ्याल हवी असा सल्ला काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोपरखळी मावळकरांना दिली आहे.ते, मावलत माउंट विस्टा या गृह प्रकल्पाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते…