प्रतिनिधी, मुंबई : 27 वर्षीय आरोपी कार चालक डॉक्टर रेहान राशीदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्यचा मृत्यू मंगळवारी झाला असला, तरी घटनेच्या रात्रीच उपस्थितांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केल्याने गावदेवी पोलिसांनी त्याला अटक केली होती
उड्डाणपुलावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारच्या धडकेत जखमी झालेल्या बाईकस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील गावदेवी फ्लायओव्हरवर हा अपघात झाला होता. जे जे हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेला निवासी डॉक्टर केम्प्स कॉर्नर ब्रिजवर चुकीच्या दिशेने भरधाव वेगात येत होता. त्याच्या कारने दिलेल्या धडकेत 22 वर्षीय आदित्य देसाई 30 फूट खाली कोसळला होता. त्याला उपचारासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली
