जनतेज न्युज

आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या एका तहसीलदाराचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल

प्रतिनिधी, नांदेड : रेती चोरी थांबवणं माझं काम नाही यासोबतच आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या एका तहसीलदाराचा व्हीडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालाय. नांदेड जिल्ह्यातील माहूर इथले तत्कालीन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांचा हा व्हीडिओ आहे. या व्हीडिओत तहसीलदाराने रेती चोरीची तक्रार करणाऱ्यालाच उलट सवाल केलेयत. हे साले दारू पीत बसणार आणि मी काय राखणदारी करायची काय, असा सवाल तहसीलदार तक्रारदाराला करतायत,  दरम्यान, सर्व पक्षीय नेत्यांनी तक्रार केल्या नंतर काही दिवसांपूर्वीच याच तहसीलदाराची बुलडाणा जिल्ह्यात बदली झालीय. मात्र आता त्यांचा जुना व्हीडिओ व्हायरल झाल्याने ते चर्चेत आलेयत.